top of page
  • Facebook

STLMM स न वि वि

Writer: Amol BhagwatAmol Bhagwat

३/१६/२०२५

श्री अमोल भागवत

:

STLMM स न वि वि
STLMM स न वि वि

नमस्कार सेंट लुईस मराठी मंडळ,


पत्र लिहिण्यास कारण की , खरं सांगू का, कारण असं काही नाही. पण जरा उशीरंच झालाय पण ठीक आहे, better late than never.


तर, तशी आपली ओळख होऊन, डझनापेक्षा जास्त वर्ष झाली.डोंबिवली हुन नोकरीसाठी सेंट लुईसला आलो होतो , हळूहळू बस्तानही बसू लागले होते, आणि गणेशोत्सवात जेव्हा काहीतरी चुकचुकल्या सारखे वाटू लागले तेव्हा तुझी माहिती मिळाली.त्या गणेशोत्सवातील उर्जा , आरत्यांचा नाद आणि उकडीचे मोदक…आहाहा ऽऽऽ मग काय पहिल्याच भेटीत मिळालेल्या ह्या भेटीने, ये दोस्ती दूर तक चलेगी ची खात्री पटली.


विविघ कार्यक्रमातुन मान्यवर कलाकारांना जवळून बघता आलं, त्यांच्या कलेचा आस्वाद घेता आला. अनेक चांगल्या गोष्टी अनुभवता आल्या.


तुझ्यामार्फतच अनेक नवीन मित्र मैत्रिणींची ओळख झाली, काहींशी ती मैत्री अधिकच घट्ट झाली. माझ्या आधी पासून ह्या शहरात असणाऱ्या अनेक काका-काकु, मावशींची छान ओळख झाली त्यांनाही नित्य नियमाने भेटणे तुझ्यामुळेच शक्य झाले. त्याच्या अनुभवाची शिदोरी उघडण्यात तुझा मोलाचा वाटा होता.


आज,त्या पैकी काही ओळखीचे चेहरे, हे शहर सोडून गेलेत, तर काही देश ,तर काही हा ग्रह ,पण आजही कुठल्यन् कुठल्या निमित्ताने त्यांची येणारी आठवण तुझ्या उल्लेखाशिवाय पु्र्ण होतं नाही.

चल, आवरतं घेतो आणि लवकरच भेटू ह्या विश्वासाने हा पत्र प्रपंच थांबवतो.


तुझा, एक ऋणी सभासद


ता.क.- हे पत्र जरी मी लिहीत असलो तरीही माझ्या सारखे ,जे आपलं गाव, शहर सोडून आपली नवीन ओळख बनवण्यासाठी इथे आले आहेत त्या सगळ्यांचा प्रतिनिधि म्हणुन लिहीत आहे.

23 Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
Rated 5 out of 5 stars.

प्रिय अमोल स न वि वि

तुझे पत्र मिळाले, उत्तर लिहायला उशीर झाला त्या बद्धल माफी. पत्र वाचून खुप बरे वाटले. आपण सर्व एकाच बोटीवर प्रवास करत आहोत , तेव्हा आपण सर्वांनी एकमेकांना जोडून प्रेमाने हा प्रवास करुया, ही सद्धिच्छा.

स ट ल म म सभासद

सुरेखा जोशी

Like
Amol Bhagwat
Mar 25
Replying to

Thank you so much.so many wonderful interactions and memories to cherish.

Like

Rated 5 out of 5 stars.

खूप छान !! पत्रा पत्रि आणि मराठी मंडळआला योग्य न्याय.

Like
Amol Bhagwat
Mar 18
Replying to

Thank you Santosh

Like

Rated 5 out of 5 stars.

खरं आहे. जन्मभूमीपासून दूर गेल्यावर कर्मभूमीच आपली वाटते, तिच्याशी एक वेगळेच नाते जोडले जाते.

Like
Amol Bhagwat
Mar 18
Replying to

Thank you Arti

Like

Rated 5 out of 5 stars.

From our first Ganapati event in 2010 to recent Patra Patri, STL Marathi Mandal has always been that giving hand for us which offered great friends as family till date and will continue doing the same in future. अगदी खोल मनातलं जे दडलेलं असतं ते तू अगदी सहज समोर मांडलस. Keep writing such heartwarming articles.

Like

Rated 5 out of 5 stars.

well written Amol

Like
bottom of page